Pune | Sun, 21 June 2026

No Ad Available

योग निरोगी व संतुलित जीवनाचा मंत्र – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Admin | 6 views
योग निरोगी व संतुलित जीवनाचा मंत्र  – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई, दि. २१ : योग भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा असून निरोगी, संतुलित आणि सकारात्मक जीवन जगण्याचा मंत्र आहे. प्रत्येकाने नियमित योगाभ्यास करावा, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय  राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मलबार हिल येथील प्रियदर्शनी पार्क येथे आयोजित योग कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, योगामुळे शरीर आणि मन सुदृढ राहते, तसेच जीवनात सकारात्मकतेची ऊर्जा निर्माण होते. बदलत्या जीवनशैलीत आरोग्य जपण्यासाठी योग हा सर्वात प्रभावी माध्यम असून प्रत्येकाने आपल्या जीवनात समावेश करावा.

प्रियदर्शनी पार्कच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या सुसीबेन शाह यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला  खासदार मिलिंद देवरा, आमदार मनीषा कायंदे, सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या विश्वस्त मीना कांबळी, माजी न्यायमूर्ती सी. व्ही. भडंग उपस्थित होते.

योगगुरू रवी दीक्षित आणि अन्वय दीक्षित यांच्या योगिक गुरुकुल, डॉ. रोहित साने यांच्या माधवबाग तसेच रेखा गुप्ता यांच्या इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे हँगिंग गार्डन यांनी आयोजनात सहभाग घेतला.

००००००


Join WhatsApp