इंदापूर : रोटरी क्लब ऑफ इंदापूर, जीविका फाउंडेशन पुणे व ZS कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गर्भाशय कर्करोग मुक्त भारत’ अभियानांतर्गत गुरुकुल विद्यामंदिर गोखळी येथील विद्यार्थिनींना मोफत लसीकरण करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश मुलींमध्ये गर्भाशय कर्करोगाबाबत जनजागृती करून प्रतिबंधात्मक लसीकरणाद्वारे त्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हा होता.
या प्रसंगी गुरुकुल गोखळीचे संस्थापक अध्यक्ष हरणावळ गुरुजी, मुख्याध्यापक विश्वास हुलगे ,
जीविका फाउंडेशनचे प्रकल्प समन्वयक सुभाष आंग्रे, रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे अध्यक्ष नितीन शहा,
सदस्य उदय शहा, पद्मसिंह जाधव तसेच सचिव प्रशांत घुले उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. उपस्थितांनी विद्यार्थिनींना आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना मोठा लाभ झाला असून पालकांनीही समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. समाजोपयोगी उपक्रम राबवून विद्यार्थिनींच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्याबद्दल आयोजक संस्थांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

