गुरुकुल विद्या मंदिर, गोखळी येथे रोटरी क्लब ऑफ इंदापूर, JEEVIKA Foundation, पुणे आणि गुरुकुल विद्या मंदिर गोखळी यांच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही (ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरणाविषयी जनजागृती अभियान उत्साहात राबविण्यात आले.
या अभियानांतर्गत विद्यार्थिनी, पालक व शिक्षकवर्ग यांना एचपीव्ही विषाणू, त्यापासून होणारे आजार तसेच गर्भाशय मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी लसीकरणाचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात तज्ञ डॉक्टरांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली:
- डॉ. शुभदा चव्हाण
- डॉ. सचिन थोरवे
- डॉ. यतीन शिंदे
या तिघांनीही एचपीव्ही लस सुरक्षित, प्रभावी आणि योग्य वयात देणे अत्यंत आवश्यक असल्याचे स्पष्ट सांगितले.
कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक भरत हरणावळ सर, रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे माजी अध्यक्ष पद्मसीह जाधव, विद्यमान सचिव प्रशांत घुले सर, माजी केंद्र प्रमुख सिद्धार्थ चव्हाण सर तसेच इतर पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे समाजात आरोग्यजागृती वाढण्यास मोठी मदत होणार असून, विद्यार्थिनींमध्ये कर्करोग प्रतिबंधाबाबत योग्य माहिती पोहोचण्यास हातभार लागला आहे.
कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन अत्यंत उत्कृष्टरीत्या पार पडले असून उपस्थितांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले.

