Pune | Sun, 21 June 2026

No Ad Available

एकल महिला धोरणासाठी मुंबई शहरातील नागरिकांनी सूचना पाठवाव्यात

Admin | 5 views
एकल महिला धोरणासाठी मुंबई शहरातील नागरिकांनी सूचना पाठवाव्यात

मुंबई, दि. २१ : राज्यातील विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, अविवाहित तसेच इतर सर्व प्रकारच्या एकल महिलांच्या सर्वांगीण विकास व सक्षमीकरणासाठी  शासन स्वतंत्र एकल महिला धोरण तयार करीत आहे. या धोरणाची प्रभावी व सर्वसमावेशक अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी नागरिक, महिला संघटना, सामाजिक संस्था, अभ्यासक व विषयतज्ज्ञ यांनी आपल्या सूचना व अभिप्राय व्हॉट्सॲप क्रमांक ९८६९८६९२८३ वर पाठवावेत, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी  शोभा शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक व कायदेशीर सक्षमीकरणासाठी धोरण तयार करताना विविध स्तरांवरील अनुभव व सूचना विचारात घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे सूचना पाठविताना केवळ समस्या मांडण्याऐवजी त्यावरील ठोस उपाययोजना, नवीन योजना, विद्यमान योजनांमधील आवश्यक सुधारणा तसेच कायदेशीर बदल याबाबत सविस्तर सूचना सादर कराव्यात

प्राप्त होणाऱ्या सूचना व अभिप्रायांचा एकल महिला धोरणाचा अंतिम मसुदा तयार करताना गांभीर्याने विचार करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व संबंधितांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे  शोभा शेलार यांनी म्हटले आहे.

00000


Join WhatsApp