
मुंबई, दि. १७ : भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी वल्सा नायर- सिंग यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या अध्यक्षपदाची व गोपनीयतेची शपथ सह्याद्री अतिथीगृह येथे दिली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले.

कार्यक्रमास ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला आदींसह सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


०००
निलेश तायडे/विसंअ
