Pune | Fri, 19 June 2026

No Ad Available

एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणासाठी सूचना आणि अभिप्राय पाठविण्याचे आवाहन  

Admin | 1 views
एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणासाठी सूचना आणि अभिप्राय पाठविण्याचे आवाहन   

मुंबई, दि.१९ : राज्यातील एकल महिलांना सन्मानपूर्वक, सुरक्षित आणि स्वावलंबी जीवन जगता यावे, यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात येत आहे. हे धोरण अधिक व्यापक, लोकाभिमुख आणि परिणामकारक करण्यासाठी राज्यातील एकल महिला, नागरिक, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, संशोधक आणि विषयतज्ज्ञ यांनी आपल्या सूचना व अभिप्राय ८२०८५८९१९५ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावेत, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे महिला व बालविकास अधिकारी शरद कुऱ्हाडे यांनी केले आहे.

एकल महिलांसमोरील समस्या केवळ मांडण्याऐवजी त्या सोडविण्यासाठी शासनाने कोणत्या ठोस उपाययोजना कराव्यात, कोणत्या नवीन योजना सुरू कराव्यात; तसेच विद्यमान योजनांमध्ये, कायद्यांमध्ये किंवा नियमांमध्ये कोणते बदल आवश्यक आहेत, याबाबत सविस्तर सूचना पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अभिप्राय पाठविताना केवळ मत नोंदविण्याऐवजी संबंधित विषयाची पार्श्वभूमी, सुचविलेली उपाययोजना, संभाव्य लाभार्थी आणि अपेक्षित परिणाम यांचा समावेश असलेला सुस्पष्ट प्रस्ताव सादर करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

एकल महिलांसाठी तयार होणारे धोरण अधिक प्रभावी आणि सर्वसमावेशक व्हावे, यासाठी समाजातील एकल महिला; तसेच सर्व संबंधित घटकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे नमूद करून अधिकाधिक नागरिकांनी या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असेहीकरण्यात आले आहे.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ

 

 

 


ताज्या बातम्या

Join WhatsApp