Pune | Sun, 15 February 2026

No Ad Available

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा जाधव कुटुंबियांच्या डोक्यावर मायेचा हात…

Admin | 8 views
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा जाधव कुटुंबियांच्या डोक्यावर मायेचा हात…

सातारा/फलटण, दि. ०२: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचा बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुःखद घटनेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी स्वतःचे दुःख बाजूला ठेवत दिवंगत विदीप जाधव यांच्या तरडगाव (ता. फलटण) येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

दिवंगत जाधव यांच्या पत्नी व मुलांच्या डोक्यावर मायेने हात फिरवत, “कोणत्याही अडचणीत मी तुमच्या सोबत आहे,” असा धीर देत त्यांनी जाधव कुटुंबियास आधार दिला. या भावस्पर्शी भेटीने उपस्थितांचे डोळे पाणावले.

कर्तव्यपथावर असतानाही अत्यंत संयम व मायेने जाधव कुटुंबियांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संवेदनशीलतेचा आदर्श घालून दिला.

०००


Join WhatsApp