Pune | Mon, 16 February 2026

No Ad Available

राज्यातील २३ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी उद्या मतदान

Admin | 21 views
राज्यातील २३ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी उद्या मतदान

मुंबई, दि. 19: राज्यातील 23 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांसाठी; तसेच विविध नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील 143 सदस्यपदांच्या जागांसाठी शनिवार 20 डिसेंबर रोजी मतदान होणार असून सर्व  नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी 21 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 288 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम 4 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर केला होता. त्यानुसार 2 डिसेंबर 2025 रोजी 263 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान झाले. उर्वरित ठिकाणी उद्या मतदान होणार आहे. सर्व संबंधित ठिकाणी 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होईल.

0000


Join WhatsApp