
मुंबई दि. 26: भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी लोकभवन येथे राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांनी राष्ट्रध्वजाला सलामी व मानवंदना दिली.
राज्यपालांचे सहसचिव एस. राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे, राज्यपालांचे परिसहायक अभयसिंह देशमुख, राज्यपालांचे परिसहायक ले. विक्रम कुमार व अन्य अधिकारी हे यावेळी उपस्थित होते.
77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा राज्यातील जनतेला उद्देशून संदेश खालील लिंक वरुन पाहता येईल.
https://www.youtube.com/live/Q-ZJbdHgGIY
00000
