Pune | Sun, 15 February 2026

No Ad Available

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, नागपूर विभागात देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

Admin | 9 views
प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, नागपूर विभागात देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई, दि. २३  : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रजासत्ताक दिनानिमित्त सहा महसूली विभागात गीत, नृत्य, नाट्य यांच्या सादरीकरणातून देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

वंदे मातरम् या देशभक्तीपर गीत व नृत्याविष्कारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सोमवार, २६ जानेवारी २०२६ रोजी, रात्रौ  ८:१५वा. रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे करण्यात आले आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली  ‘वंदे मातरम्’  हा देशभक्तीपर गीत व नृत्याविष्कार चा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमात गायक राहुल गंगाधर जेठे, गायिका प्रिया सतिश पवार आणि भाग्यश्री अभ्यंकर व समुह, तसेच नृत्याविष्कार: फ्युजन इंस्टिट्यूट ऑफ डांस समुह, यांचा सहभाग असून प्रवेश विनामूल्य  आहे तरी जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे आणि आस्वाद घ्यावा असे आवाहन संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.

0000

संजय ओरके/विसंअ


Join WhatsApp