
मुंबई, दि. 14 : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीदिनी विधान भवन येथे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव – 1 जितेंद्र भोळे यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उप सचिव मोहन काकड, अवर सचिव (समिती) सुरेश मोगल, उप सभापती, विधानपरिषद यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ.संतोष उडतेवार, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने, अशोक मोहिते यांच्यासह इतर अधिकारी/कर्मचाऱ्यांनीही पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
००००
