Pune | Fri, 17 April 2026

No Ad Available

नद्यांच्या प्रदूषण नियंत्रणावर लक्ष ठेवण्यासाठी ऑनलाईन यंत्रणा उभारा – पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे

Admin | 13 views
नद्यांच्या प्रदूषण नियंत्रणावर लक्ष ठेवण्यासाठी ऑनलाईन यंत्रणा उभारा – पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे

मुंबई, दि. 1 : नद्यांमधील प्रदूषण नियंत्रणासाठी सतत तपासणीसाठी ऑनलाईन यंत्रणा उभारण्याबाबत पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी बैठक घेतली. ‘नमामी गंगा’ उपक्रमातील पद्धतीचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

पर्यावरण मंत्री मुंडे म्हणाल्या की, राज्यातील नद्यांतींल प्रदूषण नियंत्रणासाठी तपासणी यंत्रणा ऑनलाईन व्हावी, यासाठी यंत्रणा उभारण्यात यावे. नमामी गंगे अभियानात ज्या प्रकारे यंत्रणा उभारण्यात आली त्याचा अभ्यास करून तशी यंत्रणा महाराष्ट्रात उभारण्यात यावी. तसेच यासंदर्भात एक अॅप तयार करण्यात यावे.

यावेळी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, सहसंचालक (जल) जगन्नाथ साळुंखे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राहुल रेखावार हे दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ

 

 


Join WhatsApp