Pune | Tue, 17 February 2026

No Ad Available

मुख्य सचिव राजेशकुमार यांनी केली रामकाल पथसह विविध कामांची पाहणी

Admin | 23 views
मुख्य सचिव राजेशकुमार यांनी केली रामकाल पथसह विविध कामांची पाहणी

नाशिकदि. ८ (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार यांनी आज सायंकाळी रामकुंडसह विविध स्थळांना भेट देत पाहणी केली. तसेच याठिकाणी सुरू असलेल्या विविध विकास कामांना गती देण्याचे निर्देश दिले.

नाशिक त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिव राजेशकुमार आज नाशिक येथे आले होते. दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतल्यानंतर त्यांनी द्वारका परिसरअमृत स्नान पर्वणी मार्गरामकुंडकाळाराम मंदिरसीता गुंफास्मार्ट सिटी नियंत्रण कक्ष आदी ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली.

यावेळी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवलेनियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयगृह विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार (विशेष)विभागीय आयुक्त तथा नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडामकुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंहमहानगरपालिका आयुक्त मनीषा खत्रीजिल्हाधिकारी आयुष प्रसादजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवारपोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आदी उपस्थित होते.

महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री यांनी रामकाल पथसीसीटीव्हीनियंत्रण कक्ष आदींसह महानगरपालिकेतर्फे कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली.

00000


Join WhatsApp