Pune | Sun, 15 February 2026

No Ad Available

मंत्रालयात ‘राष्ट्रीय मतदार दिना’ची शपथ

Admin | 6 views
मंत्रालयात ‘राष्ट्रीय मतदार दिना’ची शपथ

मुंबई, दि. २३ : देशभर २५ जानेवारी रोजी ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा केला जातो. २३ जानेवारी रोजी मंत्रालयात यानिमित्त आयोजित कार्यक्रमात वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता यांनी उपस्थितांना मतदार दिनाची शपथ दिली.

यावेळी मुख्य सचिव कार्यालयाचे सह सचिव मकरंद देशमुख, सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांच्यासह  अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

२५ जानेवारी १९५० रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. भारत निवडणूक आयोगामार्फत देशामध्ये निष्पक्ष व पारदर्शकरित्या निवडणुकांचे संचालन करण्यात येते. २०११ पासून भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जात आहे.

०००

एकनाथ पोवार/विसंअ


Join WhatsApp