
मुंबई, दि. १३ : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सहकार महर्षी वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विधान भवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार व पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-1 जितेंद्र भोळे, उप सभापती यांचे खाजगी सचिव अविनाश रणखांब, अवर सचिव (समिती) सुरेश मोगल, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
००००
