Pune | Mon, 20 April 2026

No Ad Available

भांडेवाडी पोलीस स्टेशनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

Admin | 20 views
भांडेवाडी पोलीस स्टेशनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

नागपूर, दि. २२ मार्च : नागपूर शहरातील वाढती लोकसंख्या, शहराच्या बाहेरील भागांमध्ये वेगाने होणारे शहरीकरण तसेच कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने भांडेवाडी येथील पोलीस स्टेशन सुरु झाले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यास नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते आज सुसज्ज अशा भांडेवाडी पोलीस स्टेशनचे उद्घाटन झाले. त्या प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या प्रसंगी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंघल, पोलीस उपायुक्त निकेतन कदम तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

भांडेवाडी पोलीस ठाण्याच्या स्थापनेमुळे परिसरातील नागरिकांना जलद व प्रभावी पोलीस सेवा उपलब्ध होणार असून गुन्हे प्रतिबंध, कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यास मोठी मदत होणार  असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

या पोलीस ठाण्यात अत्याधुनिक सुविधा, तांत्रिक साधने तसेच नागरिकाभिमुख सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे पोलीस कार्यक्षमता वाढून प्रतिसाद वेळेत सुधारणा होणार आहे. नागपूर पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध असून, नव्याने सुरू करण्यात आलेले भांडेवाडी पोलीस ठाणे हे त्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

प्रारंभी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी स्वागत करून पोलीस स्टेशन संदर्भात माहिती दिली.

00000


Join WhatsApp