
मुंबई ११ : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत वाद्यरंग या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमात ७५ पेक्षा जास्त दुर्मिळ व पारंपरिक वाद्याचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित स्वराज्य की शपथ या टपाल तिकीटाचे प्रकाशन व महात्मा गांधी संकलित वाङ्मय- भाग २ चे प्रकाशन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय विविध वाद्यांच्या जुगलबंदीचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
‘वाद्यरंग’ या सांस्कृतिक कार्यक्रमाची संकल्पना मंत्री ॲड.आशिष शेलार यांची असून या कार्यक्रमास सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या कार्यक्रमातून २०० पेक्षा जास्त कलाकारांना आपली कला दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
वाद्यरंग हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम १४ ऑक्टोबर, २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता कलांगण, रविंद्र नाट्यमंदीर, प्रभादेवी, मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.
0000
