Pune | Sun, 15 February 2026

No Ad Available

‘कुणकेश्वराच्या विकासासाठी कटीबद्ध; अधिकाधिक निधी देणार’  -पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही

Admin | 2 views
‘कुणकेश्वराच्या विकासासाठी कटीबद्ध; अधिकाधिक निधी देणार’  -पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही

सिंधुदुर्गनगरी दिनांक १५ (जिमाका) :- कोकणाची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देव कुणकेश्वरच्या यात्रेला अनेक वर्षांपासून मी नियमितपणे दर्शनासाठी येत आहे. श्री कुणकेश्वराचे दर्शन घेणे हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. माझ्या सार्वजनिक आणि वैयक्तिक प्रवासात कुणकेश्वराचा मोठा आशीर्वाद लाभला आहे असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

आज त्यांनी प्राचीन व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या श्री कुणकेश्वर मंदिर येथे विधिवत दर्शन घेऊन पूजा-अर्चा केली. दर्शनानंतर उपस्थित भाविकांशी संवाद साधताना ते बोलत होते.

पालकमंत्री म्हणालेकुणकेश्वर हा केवळ धार्मिक स्थळ नसून कोकणाच्या सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे. या परिसराचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास करणे ही माझी जबाबदारी आहे. या भागाच्या विकासकामांसाठी आवश्यक तेवढा जास्तीत जास्त निधी शासनामार्फत उपलब्ध करून देण्यासाठी मी कटीबद्ध असून ती जबाबदारी निश्चितपणे मी पूर्ण करणार आहे  असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले कीयात्राकाळात लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधास्वच्छतावाहतूक व्यवस्थापिण्याचे पाणीप्रकाशयोजना आणि सुरक्षाव्यवस्था यांसारख्या बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. स्थानिक ग्रामस्थदेवस्थान समिती आणि प्रशासन यांच्या समन्वयातून विकास आराखडा तयार करून टप्प्याटप्प्याने कामे हाती घेतली जातीलअसे त्यांनी स्पष्ट केले.

दरवर्षी कुणकेश्वर यात्रेला यशस्वी बनविण्यासाठी जिल्हा प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असतेअसे नमूद करत त्यांनी प्रशासनाच्या कार्याचे कौतुक केले. यावर्षी प्रशासनाने राबवलेल्या  प्लास्टिक मुक्त यात्रा‘ या उपक्रमाचे   देखील त्यांनी कौतुक केले. भाविकांना अधिक सोयी-सुविधा  उपलब्ध व्हाव्यातयासाठी शासन स्तरावर आवश्यक निर्णय घेतले जातीलअसेही त्यांनी सांगितले.

यावेळी स्थानिक पदाधिकारीदेवस्थान समितीचे सदस्यअधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000


Join WhatsApp