Pune | Tue, 23 June 2026

No Ad Available

३६ व्या मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेत ‘करुणाष्टके’ नाटकाने पटकाविले प्रथम पारितोषिक

Admin | 5 views
३६ व्या मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेत ‘करुणाष्टके’ नाटकाने पटकाविले प्रथम पारितोषिक

मुंबई, दि. २३ : 36 व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत भद्रकाली प्रॉडक्शन्स, मुंबई या संस्थेच्या करुणाष्टके या नाटकाला रु. 7 लाख 50 हजाराचे प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे

जिगिषा अष्टविनायक, मुंबई या संस्थेच्या भूमिका या नाटकास रु. 4 लाख 50 हजाराचे द्वितीय पारितोषिक आणि जिगिषा क्रिएशन्स या संस्थेच्या चिरंजीव परफेक्ट बिघडलाय या नाटकास रु. 3 लाखाचे तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.

दिग्दर्शन :- प्रथम पारितोषिक (रु.1,50,000/-) प्राजक्त देशमुख (नाटक- करुणाष्टके)

द्वितीय पारितोषिक (रु.1,00,000/-) चंद्रकांत कुलकर्णी (नाटक- भूमिका)

तृतीय पारितोषिक (रु.50,000/-) विनोद रत्ना (नाटक- चिरंजीव परफेक्ट बिघडलाय)

नाट्यलेखन : प्रथम पारितोषिक (रु.1,00,000/-) क्षितीज पटवर्धन (नाटक- भूमिका )

द्वितीय पारितोषिक (रु.60,000/-) प्राजक्त देशमुख (नाटक- करुणाष्टके)

तृतीय पारितोषिक (रु.40,000/-) ऋषिकेश जोशी (नाटक- सं.बोलविता धनी)

प्रकाश योजना : प्रथम पारितोषिक (रु.40,000/-) तेजस देवधर (नाटक- ठरलय फॉरेव्हर)

द्वितीय पारितोषिक (रु.30,000/-) शितल तळपदे (नाटक- सविता दामोदर परांजपे)

तृतीय पारितोषिक (रु.20,000/-) अमोघ फडके (नाटक- मी vs मी)

नेपथ्य :         प्रथम पारितोषिक (रु.40,000/-) सचिन गावकर (नाटक- करुणाष्टके)

द्वितीय पारितोषिक (रु.30,000/-) संदेश बेंद्रे (नाटक- सविता दामोदर परांजपे)

तृतीय पारितोषिक (रु.20,000/-) सुमीत पाटील (नाटक- ठरलय फॉरेव्हर)

संगीत दिग्दर्शन:  प्रथम पारितोषिक (रु.40,000/-) अजित परब (नाटक-संगीत बोलविता धनी)

द्वितीय पारितोषिक (रु.30,000/-) निनाद म्हैसाळकर (नाटक- सविता दामोदर परांजपे)

तृतीय पारितोषिक (रु.20,000/-) अशोक पत्की (नाटक- कुटुंब किर्रतन )

वेशभूषा :        प्रथम पारितोषिक (रु.40,000/-) मयुरा रानडे (नाटक-सं.बोलविता धनी)

द्वितीय पारितोषिक (रु.30,000/-) चैत्राली डोंगरे (नाटक- सविता दामोदर परांजपे)

तृतीय पारितोषिक (रु.20,000/-) आशिष देशपांडे (नाटक- करुणाष्टके)

रंगभूषा :         प्रथम पारितोषिक (रु.40,000/-) राजेश परब (नाटक- संगीत बोलविता धनी)

द्वितीय पारितोषिक (रु.30,000/-) उलेश खंदारे (नाटक- भूमिका)

तृतीय पारितोषिक (रु.20,000/-) भरत वर्दम (नाटक- कुटुंब किर्रतन)

उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक व रु.50,000/-

पुरुष कलाकार : सचिन खेडेकर (नाटक- भूमिका), क्षितिज दाते (नाटक- सं. बोलविता धनी), श्रेयस जोशी (नाटक- चिरंजीव परफेक्ट बिघडलाय), आस्ताद काळे (नाटक- सविता दामोदर परांजपे), सुयश झुंजुरके (नाटक- भूमिका).

स्त्री कलाकार : पर्ण पेठे (नाटक- करुणाष्टके),  मयुरी देशमुख (नाटक- सविता दामोदर परांजपे), समिधा गुरु (नाटक-भूमिका), ऋतुजा दुर्गुळे (नाटक- ठरलय फॉरेव्हर), गितांजली कुलकर्णी (नाटक-करुणाष्टके)

8 जून ते 18 जून, 2026 या कालावधीत छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर, दादर (प), मुंबई या ठिकाणी अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण 10 व्यावसायिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून नयना आपटे, सुहास जोशी, प्रदीप कबरे, शेखर ढवळीकर व नंदकुमार पाटील यांनी काम पाहिले.

सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या नाटकांच्या नाट्यनिर्मात्यांचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले.

व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहभागी झालेल्या सर्व संस्था आणि कलाकार यांनी मेहनत घेऊन सादर केलेल्या सर्व दर्जेदार नाटकांना प्रेक्षकांची भरघोस उपस्थिती होती. भविष्यातही नाट्यनिर्माते व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे.

0000

संजय ओरके/विसंअ

 

 


Join WhatsApp