Pune | Tue, 17 February 2026

No Ad Available

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात दंत शल्यचिकित्सक डॉ.अर्चना पवार यांची १८ व २५ नोव्हेंबर रोजी मुलाखत

Admin | 16 views
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात दंत शल्यचिकित्सक डॉ.अर्चना पवार यांची १८ व २५ नोव्हेंबर रोजी मुलाखत

मुंबई, दि. 14 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘मौखिक आरोग्य आणि खबरदारी’ या महत्त्वपूर्ण विषयावर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या दंत शल्यचिकित्सक डॉ. अर्चना पवार यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

मानवी शरीराच्या एकूण आरोग्याशी मौखिक आरोग्याचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे. दातांची कीड, हिरड्यांचे विकार, मुखदुर्गंधी, तंबाखूजन्य आजार आदी समस्यांमुळे दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होऊ शकतो. विशेषतः वृद्धापकाळातील आजार, औषधांचे दुष्परिणाम आणि तोंडातील बदल यांच्या संदर्भात योग्य माहिती असणे अत्यावश्यक आहे. या सर्व विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करत मौखिक आजारांचे प्रकार, त्यांची लक्षणे आणि आरोग्य राखण्यासाठी आवश्यक काळजी याबाबत डॉ. पवार यांनी कार्यक्रमातून उपयुक्त माहिती दिली आहे.

जय महाराष्ट्र कार्यक्रमात या मुलाखतीचे प्रसारण दोन भागात करण्यात येणार असून पहिला भाग : मंगळवार, 18 नोव्हेंबर 2025 तसेच दुसरा भाग : मंगळवार, 25 नोव्हेंबर 2025 रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर रात्री 8.00 वाजता प्रसारित होणार आहे. तसेच ही मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पुढील अधिकृत समाजमाध्यमांवरही पाहता येईल. निवेदक सुचीता गरूडे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

 

X (Twitter) : https://twitter.com/MahaDGIPR

Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

०००

जयश्री कोल्हे/स.सं


Join WhatsApp