Pune | Sun, 15 February 2026

No Ad Available

‘हुतात्मा दिन’ निमित्त महाराष्ट्र सदनात हुतात्म्यांना अभिवादन

Admin | 12 views
‘हुतात्मा दिन’ निमित्त महाराष्ट्र सदनात हुतात्म्यांना अभिवादन

नवी दिल्ली, 30 : देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आज ‘हुतात्मा दिन’ पाळण्यात आला. या निमित्त कॉपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनाच्या  सभागृहात आयोजित कार्यक्रमात दोन मिनिटांचे मौन बाळगून हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून अभिवादन करण्यात आले.

यावेळी निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, सहायक लेखाधिकारी निलेश केदारे, व्यवस्थापक प्रमोद कोलपते, उपअभियंता किरण चौधरी तसेच महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रातील इतर कर्मचारी व अधिकारी  उपस्थित होते.

000000

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली


Join WhatsApp