Pune | Sun, 07 June 2026

No Ad Available

योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी डिजिटल प्रणालींचा वापर वाढवा वसतिगृहांच्या विद्यार्थी प्रवेश क्षमतेची माहिती पोर्टलवर टाकावी — सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

Admin | 22 views
योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी डिजिटल प्रणालींचा वापर वाढवा वसतिगृहांच्या विद्यार्थी प्रवेश क्षमतेची माहिती पोर्टलवर टाकावी — सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

मुंबई, दि. 28 : सामाजिक न्याय विभागाच्या योजना अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी डिजिटल प्रणालींचा वापर वाढवणे आवश्यक आहे. विभागांतर्गत असणाऱ्या वसतिगृहांची क्षमता, सुविधा, उपलब्ध जागा आणि इतर आवश्यक तपशील विद्यार्थ्यांना सुलभपणे मिळावेत, यासाठी वसतिगृहांच्या पोर्टलवर ही माहिती ऑनलाईन पद्धतीने टाकावी, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले.

सामाजिक न्याय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विभागाच्या प्रलंबित प्रस्तावासंबंधी आढावा बैठक मंत्रालयात झाली. या बैठकीस विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, सहसचिव सो. ना. बागुल, उपसचिव वर्षा देशमुख, उपसचिव रवींद्र गोरवे तसेच विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा लाभ तळागाळातील प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. लाभार्थ्यांना योजनांचा लाभ वेळेत आणि योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी संबंधित यंत्रणांनी अधिक समन्वयाने काम करावे. विभागाचे व्हॉट्सअ‍ॅप ब्रॉडकास्ट चॅनल सुरू करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.

अपूर्ण प्रस्तावांमुळे मंजुरी प्रक्रियेत होणारा विलंब टाळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, माहिती आणि तांत्रिक बाबींची पूर्तता करूनच प्रस्ताव सादर करावेत. तसेच प्रलंबित कामांना गती देण्यासाठी आवश्यक सूचना मंत्री संजय शिरसाट यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

बैठकीत विविध योजनांशी संबंधित प्रलंबित प्रस्ताव, मंजुरी प्रक्रिया आणि अंमलबजावणीतील अडथळ्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

0000

शैलजा पाटील / वि.सं.अ.


Join WhatsApp