Pune | Fri, 17 April 2026

No Ad Available

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाला १५० दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत ई-गव्हर्नन्स पुरस्कार

Admin | 14 views
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाला १५० दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत ई-गव्हर्नन्स पुरस्कार

मुंबई, दि. 29 :  वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागाने डिजिटल गव्हर्नन्समध्ये उत्कृष्ट कामगिरी करत 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कृती आराखड्याअंतर्गत 57 शासकीय विभागांमध्ये 7 वा क्रमांक मिळविला आहे. हा पुरस्कार  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी विभागाचे सचिव धीरज कुमार यांना प्रशस्तीपत्र देऊन विभागाच्या पारदर्शकता, कार्यक्षमता आणि नागरिक सेवांमध्ये केलेल्या उल्लेखनीय सुधारणांचा गौरव करण्यात आला.

डिजिटल सुधारणा व संकेतस्थळ उन्नतीकरण

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या सुधारणांमधील एक महत्त्वाचा भाग म्हणजे S3WAAS पोर्टलवरील अधिकृत संकेतस्थळाचे सर्वसमावेशक नूतनीकरण. हे संकेतस्थळ भारत सरकारच्या वेब मार्गदर्शक तत्वांनुसार (GIGW) सुसंगत असून, WCAG 2.1 प्रमाणे अधिक सुलभता आणि AI आधारित भाषांतरासाठी भाषिणी ट्राBhashini Translation Plugin Tool सह बहुभाषिक सुविधा प्रदान करते.

डेटा-आधारित प्रशासनासाठी डॅशबोर्डस्

डेटा-आधारित प्रशासनाला चालना देण्यासाठी विभागाने अनेक रिअल-टाइम डॅशबोर्डस् सुरू केले आहेत, जसे की: कॉलेज प्रोफाइल, NextGen HMIS, रोग प्रादुर्भाव हीट मॅप्स, OPD ट्रॅकिंग या साधनांमुळे प्रशासन व नागरिक दोघांनाही आरोग्य सेवा प्रभावीपणे पाहता येतात.

नागरिक सेवा व तक्रार निवारण

  • 32नागरिक-केंद्रित सेवा ऑनलाइन उपलब्ध करण्यात आल्या आहेत
  • त्यापैकी29 सेवा “आपले सरकार” पोर्टलशी एकत्रित आहेत
  • तक्रार निवारण प्रणाली मजबूत करण्यात आली असून90% पेक्षा जास्त प्रकरणे निकाली काढली जात आहेत
  • 190पेक्षा अधिक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे

नवोन्मेष व तंत्रज्ञान वापर

विभागाने पुढील नवकल्पना स्वीकारल्या आहेत: व्हॉट्सअप आधारित चॅटबॉट, क्ल्‍िानीकल डिसीजन सपोर्ट सिस्टम (CDSS) साठी AI एजंट्स, छातीच्या एक्स-रेसाठी इमेज अॅनालिटिक्स, गर्दी व्यवस्थापन विश्लेषण, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,  एमएमसी आणि एमएसडीसीसाठी सुरक्षित प्रमाणपत्रासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान या सर्व उपक्रमांमुळे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग हा महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात ई-गव्हर्नन्स परिवर्तनाचा एक आदर्श नमुना ठरला आहे. यासाठी विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी अभिनंदन केले आहे.

00000

दत्तात्रय कोकरे/वि.स.अ


Join WhatsApp