Pune | Sun, 15 February 2026

No Ad Available

वाढदिवसानिमित्त बळीराजाला मदत करण्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांचे आवाहन

Admin | 20 views
वाढदिवसानिमित्त बळीराजाला मदत करण्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांचे आवाहन

मुंबई, दि. 25 : राज्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत शेतकरी व सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेती, घरे आणि पशुधनाची अपरिमित हानी झाली आहे. या संकट काळात पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले आहे.

26 सप्टेंबर रोजी माझ्या वाढदिवसानिमित्त कोणतेही कार्यक्रम अथवा शुभेच्छा फलक न लावता, थेट पूरग्रस्त कुटुंबांना दिलासा देण्यासाठी शक्य तेवढे योगदान मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचे आवाहन क्रीडामंत्री ॲड. कोकाटे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा तपशील :

* Account Name : Chief Minister’s Relief Fund

* Account Number : 10972433751

* IFSC Code : SBIN0000300

पूरग्रस्तांना दिलासा देणे याच खऱ्या शुभेच्छा असल्याचे सांगून, मंत्री ॲड. कोकाटे यांनी सर्व समाजघटकांनी या संकटकाळात बळीराजाच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन केले आहे.

000

श्रद्धा मेश्राम/विसंअ/


Join WhatsApp