Pune | Sun, 07 June 2026

No Ad Available

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील जनगणना २०२७ च्या स्वगणनेचा शुभारंभ

Admin | 6 views
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील जनगणना २०२७ च्या स्वगणनेचा शुभारंभ

बीड, दि.१: राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते आज जनगणना २०२७ अंतर्गत स्वगणनेचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. त्यांनी https://se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर स्वतः लॉगिन करून स्वतःची प्राथमिक माहिती भरत स्वगणनेचा शुभारंभ केला.

१ मे ते १५ मे दरम्यान होणाऱ्या स्वगणना व घरगणनेच्या प्रक्रियेचा यावेळी औपचारिक प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हाधिकारी मा. विवेक जॉन्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी मा.जितीन रहमान व पोलीस अधीक्षक मा. नवनीत कावत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मा.शिवकुमार स्वामी व उपजिल्हाधिकारी मा. शैलेश सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा जनगणना कार्यालयाच्या वतीने उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे व जिल्हा समन्वयक आशिष शिंदे यांनी स्वगणनेची माहिती सांगितली. जनगणना ही देशाच्या नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून, सर्व नागरिकांनी स्वगणनेत सहभागी होऊन अचूक माहिती देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री मा.सुनेत्राताई पवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

००००


Join WhatsApp