Pune | Sat, 14 February 2026

No Ad Available

ठेवी परत देण्यासाठी जलद गतीने कार्यवाही करावी – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

Admin | 1 views
ठेवी परत देण्यासाठी जलद गतीने कार्यवाही करावी – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

मुंबई, दि. १०: आनंदसाई अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीच्या ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी  आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग, सहकार विभाग आणि एमपीआयडी विभागाने संयुक्तपणे जलदगतीने कार्यवाही करावी, असे निर्देश सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिले.

आनंदसाई अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि. नागपूर (अवसायनात) या पतसंस्थेच्या २५ अपचारी संचालक यांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहारसंबंधी विधानसभेत उपस्थित झालेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने या संस्थेच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळवून देण्याच्या संदर्भात आढावा सहकार मंत्री पाटील यांनी घेतला. या आढावा बैठकीस सह सचिव तथा अपर निबंधक संतोष पाटील, उपसचिव यमुना कार्ले, नागपूरचे जिल्हा उपनिबंधक कडू यांच्यासह एमपीआयडीचे अधिकारी उपस्थित होते.

सहकार मंत्री पाटील म्हणाले, आनंदसाई अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि. नागपूर (अवसायनात) या पतसंस्थेच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवी विनासायास परत मिळाव्यात. यासाठी ज्यांनी हा आर्थिक गैरव्यवहार केला आहे त्यांच्या मालमत्ता जप्त करून नियमानुसार त्यावर कार्यवाही करून ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत देण्यात याव्यात. या संदर्भात होत असलेल्या कार्यवाहीचा दर महिना आढावा घ्यावा, अशा सूचनाही मंत्री पाटील यांनी दिल्या.

या पतसंस्थेच्या २५ अपचारी संचालक यांनी  केलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सहा मालमत्ता जप्त करण्यात आल्या असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. उर्वरित मालमत्ता जप्ती प्रकरणी तातडीने कार्यवाही करून ठेवीदारांना दिलासा द्यावा असे, स्पष्ट निर्देश सहकार मंत्री पाटील यांनी दिले.

०००

एकनाथ पोवार/स.सं.


Join WhatsApp