Pune | Fri, 17 April 2026

No Ad Available

स्वरांचा प्रवास थांबला… पण आठवणींची मैफल सुरूच राहील… – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Admin | 10 views
स्वरांचा प्रवास थांबला… पण आठवणींची मैफल सुरूच राहील… – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. 12 : भारतीय संगीतविश्व आज शब्दांपलीकडचे दुःख अनुभवत आहे. आशा भोसले या स्वरसम्राज्ञीचा आवाज आज कायमचा शांत झाला… पण त्यांच्या सुरांचा गंध मात्र सदैव आपल्या मनात दरवळत राहील.

मिरा-भाईंदरच्या आपल्या स्वप्नवत नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्यात त्यांची लाभलेली उपस्थिती… तो क्षण आजही डोळ्यांसमोर जिवंत आहे. त्या दिवशी त्यांच्या सान्निध्यात आपल्या शहराने अनुभवलेला अभिमान आणि आनंद… आज त्या आठवणी अधिकच भावूक करून जात आहेत.

हजारो गाण्यांतून त्यांनी भावना दिल्या, जीवनाला सूर दिले… आणि आज त्याच सुरांनी आपल्याला अश्रूंनी भरून टाकलं आहे.

त्या आपल्या सोबत नसल्या तरी त्यांचं अमर संगीत, त्यांचा प्रत्येक स्वर, प्रत्येक आठवण कायम आपल्या सोबत राहील… अशा शब्दात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वरसम्राज्ञी आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

00000


Join WhatsApp