Pune | Tue, 17 February 2026

No Ad Available

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात राष्ट्रीय एकता दिनाची शपथ

Admin | 14 views
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात राष्ट्रीय एकता दिनाची शपथ

मुंबई, दि. ३१ : भारताचे पहिले उपपंतप्रधान, गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात मुख्य सचिव राजेश कुमार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार करून अभिवादन केले. तसेच, दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त (राष्ट्रीय संकल्प दिन) त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

भारतीय एकात्मतेसाठी निश्चयपूर्वक धोरण आखून त्यासाठी पावले उचलणाऱ्या सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येत असलेल्या राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांना मुख्य सचिवांनी शपथ दिली.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे सचिव पंकज कुमार, अवर सचिव गोविंद साबणे, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, श्री. उतेकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

०००

धोंडिराम अर्जुन/स.सं


Join WhatsApp