Pune | Sun, 07 June 2026

No Ad Available

सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न समन्वयातून सोडविणार – मंत्री मकरंद जाधव-पाटील

Admin | 15 views
सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न समन्वयातून सोडविणार – मंत्री मकरंद जाधव-पाटील

मुंबई, दि. ५ : सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने गतीने कार्यवाही करावी तसेच यामध्ये समाविष्ट रा इतर ज्याकडील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करावा असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिले.

मंत्रालय येथील दालनात सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत मंत्री जाधव-पाटील बोलत होते.  बैठकीला आमदार आमश्या पाडवी, नर्मदा बचाव आंदोलनाच्या ॲड. लतिका राजपूत, चेतन साळवे, पुन्या वसावे, लोक संघर्ष समितीच्या प्रतिभा शिंदे, अवर सचिव बाळासाहेब हजारे, नंदूरबारचे अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगाटे, नंदूरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होत्या.

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील म्हणाले की, शासन निर्णयानुसार पात्र प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन करावे, टापू सर्वेक्षणातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, सरदार सरोवर प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रात ड्रोन सर्व्हेक्षणामध्ये नव्याने आढळून आलेल्या शेतजमिनीचे भुसंपादन करणे, प्रकल्पग्रस्तांच्या सिंचन सुविधांचा प्रश्न, नागरी सुविधांचा प्रश्न याबाबत त्वरीत कार्यवाही करावी.  महाराष्ट्राचे प्रकल्पबाधीत ज्यांचे गुजरात मध्ये पुनर्वसन झाले आहे त्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत गुजरात प्रशासनाशी संपर्क साधून समन्वयातून प्रश्न सोडविण्यात यावेत. सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयांनी तोडगा काढावा अशा सूचना त्यांनी केल्या.

0000

संध्या गरवारे/विसंअ


Join WhatsApp