Pune | Sat, 14 February 2026

No Ad Available

श्री क्षेत्र चौंडी प्रकल्पाच्या कामकाजाला गती द्यावी- विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

Admin | 6 views
श्री क्षेत्र चौंडी प्रकल्पाच्या कामकाजाला गती द्यावी- विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

मुंबई, दि. १०: श्री क्षेत्र चौंडी प्रकल्पाचे काम गतीने होण्यासाठी या प्रकल्पाचे उप विभाग करून टप्प्या टप्प्याने परवानग्या घेण्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी, अशी सूचना विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिली.

विधानभवनात श्री क्षेत्र चौंडी प्रकल्पाच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी संबंधित अधिकारी व अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

बैठकीत प्रकल्पाच्या अंमलबजावणीस विलंब न होता सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे जावे, असेही सभापती प्रा. शिंदे यांनी सांगितले.

श्री क्षेत्र चौंडी प्रकल्पाचे कामाबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

०००

मोहिनी राणे/स.सं


Join WhatsApp