Pune | Mon, 16 February 2026

No Ad Available

रायगड जिल्ह्यातील आशा सेविका व गटप्रवर्तकांचे सप्टेंबरचे मानधन वितरित

Admin | 13 views
रायगड जिल्ह्यातील आशा सेविका व गटप्रवर्तकांचे सप्टेंबरचे मानधन वितरित

मुंबई, दि. 17 : रायगड जिल्ह्यातील आशा सेविका व गटप्रवर्तक यांना मानधन ऑगस्ट 2025 पर्यंत देण्यात आलेले आहे. तसेच सप्टेंबर 2025 चे मानधन 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत संबंधित आशा सेविका व गटप्रवर्तक यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

राज्यस्तरावरून केंद्र शासनाचा निधी प्राप्त झाल्यानंतर आशा सेविका व गटप्रवर्तक यांचे मानधन तत्काळ त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, असेही रायगड जिल्हा आरोग्य अधिकारी, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांनी कळविले आहे.

0000

संजय ओरके/विसंअ


Join WhatsApp