
सातारा दि. 25: यंदा नवरात्रोत्सवाच्या काळातच मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे जनतेचे, विशेषतः शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले. जनजीवन विस्कळीत झाले. या परिस्थितीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी बाधित क्षेत्रांचा दौरा केला. यावेळी त्यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन जनतेला धीर दिला.
दौऱ्यादरम्यान त्यांनी कोणतीही तमा न बाळगता दुचाकीवरून चिखलातून अनवाणी फिरत शेतकऱ्यांचा बांध गाठला. सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी खंबीर आहे असा विश्वास दिला. त्याचबरोबर नुकसानीच्या भरपाईसाठी पंचनामे तातडीने करण्याचे आदेशही दिले.
0000
