Pune | Sat, 14 February 2026

No Ad Available

पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘राणी हिराई उमेद मार्ट’चे उद्घाटन

Admin | 4 views
पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘राणी हिराई उमेद मार्ट’चे उद्घाटन

चंद्रपूर, दि. 07 : ग्राामीण भागातील महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने ग्रामीण जिवनोन्नती अभियान (उमेद) जि.प. च्या वतीने तयार करण्यात आलेल्या राणी हिराई उमेद मार्टचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते करण्यात आले.

ज्युबली हायस्कूल परिसर, चंद्रपूर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवर, आमदार करण देवतळे, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, प्रकल्प संचालक मंजिरी टकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नूतन सावंत,  जिल्हा अभियान व्यवस्थापक प्रवीण भांडारकर आदी उपस्थित होते.

राणी हिराई उमेद मार्ट हे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असून येथे ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेले ब्रँड्सची विविध दुकाने उपलब्ध आहेत. तसेच अद्ययावत फूड कोर्ट, कॅफे, आवश्यक सुविधा आणि कुटुंबांसाठी आकर्षक वातावरण निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना खरेदी व मनोरंजनाचा दर्जेदार अनुभव मिळणार आहे. राणी हिराई उमेद मार्टमुळे ग्रामीण भागातील महिलांच्या उत्पन्नात वाढ होईल. चंद्रपूरवासीय जनतेने राणी हिराई उमेद मार्टमधे येऊन महिलांनी उत्पादित केलेल्या वास्तूची खरेदी करून त्यांच्या आनंदात सहभागी व्हावे, असे आवाहन मंजिरी टकले यांनी केले.

यावेळी मान्यवरांनी महिलांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांची पाहणी केली व संवाद साधला. कार्यक्रमाला उमेदचे तालुका व्यवस्थापक गजानन भिमटे, रोशन साखरेसंदीप घोंगे, शितल गर्गेलवार, मोहित नैताम, नरेंद नगराळे, अर्चना बोनसुले, उद्धव मडावी, विवेक हरणे, राजेश दुधे, अमोल मोडक, हेमचंद बोरकर, वसीम काझी आदी उपस्थित होते.

दोन सफारी वाहनांचे लोकार्पण

करवा सफारी गेट येथे स्थानिक महिलांसाठी रोजगारनिर्मिती करणे व ईको – टुरिझमला चालना देणे या उद्देशाने प्रधानमंत्री खनीज क्षेत्र कल्याण योजनेअंर्गत जिल्हा परिषदेच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या दोन सफारी वाहनांचे लोकार्पण राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार सर्वश्री सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, करण देवतळे, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह उपस्थित होते.

००००००


Join WhatsApp