
पालघर दिनांक 24: पालकमंत्री गणेश नाईक यांनी विक्रमगड पंचायत समितीमध्ये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी पर्यवेक्षकांनी स्थानिक धान्यापासून बनवलेल्या पोषण आहाराच्या स्टॉलला व आरोग्य तपासणी शिबिराला भेट दिली.
यावेळी आ. राजेंद्र गावित, आ. हरिश्चंद्र भोये, पालघर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम, जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड , जिल्हा परिषदेचे मुख कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पालकमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी, भवानजी आगे पाटील आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अंगणवाडी सेविकांनी स्थानिक विविध जातीच्या रानभाज्या, धान्य, वनौषधी पासुन बनवलेल्या पोषण आहाराच्या पदार्थांच्या स्टॉलला पालकमंत्री गणेश नाईक यांनी भेट देऊन पौष्टिक पदार्थांचा आस्वाद घेतला.
एकात्मिक बालविकास प्रकल्प योजनेच्या 150 अंगणवाडी सेविका व 7 पर्यवेक्षकांनी विविध पौष्टिक पदार्थ बनवण्यात घेतलेल्या सहभागाबद्दल पालकमंत्री गणेश नाईक यांनी अंगणवाडी सेविकांचे कौतुक केले.
स्वास्थ नारी सुरक्षित परिवार या आरोग्य अभियाना अंतर्गत अत्याधुनिक हेल्थकेअर मशीनद्वारे नागरिकांच्या एकाच वेळी 16 आरोग्य तपासण्या करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रक्तदाब, डायबिटीस, हिमोग्लोबिन, युरिक ॲसिड अशा चाचण्यांचा रिपोर्ट मोबाईलद्वारे नागरिकांना देण्याची सुविधा पुरविण्यात आली आहे.
००००
