Pune | Mon, 15 June 2026

No Ad Available

नवीन कामगार नियमावलींच्या मसुद्यावर नागरिकांनी हरकती व सूचना नोंदवाव्यात

Admin | 1 views
नवीन कामगार नियमावलींच्या मसुद्यावर नागरिकांनी हरकती व सूचना नोंदवाव्यात

मुंबई, दि. १५ : कामगार कायद्यांच्या नव्या संहितांच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यस्तरीय नियमांचा मसुदा तयार केला असून तो https://mahakamgar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मसुद्यांबाबत उद्योग क्षेत्र, कामगार संघटना, कर्मचारी; तसेच सर्वसामान्य नागरिकांनी सूचना व हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

कामगार व्यवस्थेला अधिक पादरर्शक, सुसंगत आणि आधुनिक स्वरूप देण्यासाठी केंद्र शासनाने 21 नोव्हेंबर 2025 पासून चार महत्वपूर्ण कामगार संहितांची अंमलबजावणी संपूर्ण भारतात सुरू केली आहे. यामध्ये वेतन संहिता 2019, औद्योगिक संबंध संहिता 2020, सामाजिक सुरक्षा संहीता 2020 तसेच व्यावसायिक आरोग्य, सुरक्षा व कामाची स्थिती संहिता 2020 यांचा समावेश आहे. या सर्व संहितांमध्ये विद्यमान 29 कायदे एकत्र अरण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्याच्या कामगार संहिता नियमांचा मसुदा https://mahakamgar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. संबंधित सूचना अथवा हरकती अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून 45 दिवसांच्या आत कामगार आयुक्त कार्यालय, कामागर भवन, बांद्रा – कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई 400051 या पत्त्यावर पाठवाव्यात; तसेच mh-labourcodes@gmail.com  या ईमेलवरही सूचना, हरकती स्वीकारल्या जाणार आहेत, असे मुंबई शहरचे कामगार उपायुक्त यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

००००

निलेश तायडे/विसंअ

 

 


Join WhatsApp