Pune | Sun, 15 February 2026

No Ad Available

नवी दिल्लीत प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Admin | 25 views
नवी दिल्लीत प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

नवी दिल्ली, १७: समाजप्रबोधक, विचारवंत आणि साहित्यिक केशव सीताराम ठाकरे उपाख्य प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले.

कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्र. उपसंचालक मनिषा पिंगळे यांच्यासह उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी महाराष्ट्र सदनाचे व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि प्रबोधनपर कार्याचा परिचय सर्वांना करून दिला.

या कार्यक्रमास महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्र येथील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

०००


Join WhatsApp