Pune | Sun, 07 June 2026

No Ad Available

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचा राज्य स्तरावर गौरव

Admin | 24 views
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचा राज्य स्तरावर गौरव

मुंबई, दि. २८ : राज्यात २८ एप्रिल हा ‘द्वितीय सेवा हक्क दिन’ म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने, मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. सौरभ कटियार यांना त्यांच्या प्रशासकीय कार्याबद्दल विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जिल्ह्यातील तिन्ही तहसीलदार कार्यालयांत अत्याधुनिक ‘सेतू सुविधा केंद्रे’ उभारून जनतेला तत्काळ व पारदर्शक सेवा देण्याच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची दखल राज्य शासनाने घेतली आहे.

राज्याचे मुख्य सचिव राजेश अगरवाल आणि राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांच्या हस्ते हा गौरव सोहळा संपन्न झाला.

अत्याधुनिक सोयींनी युक्त ‘सेतू’चा यशस्वी प्रयोग जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी पुढाकार घेऊन मुंबई उपनगरातील अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला या तिन्ही तहसीलदार कार्यालयांचा चेहरामोहरा बदलला आहे. येथे उभारण्यात आलेली ‘सेतू सुविधा केंद्रे’ केवळ प्रशस्तच नाहीत, तर ती अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहेत. सामान्य नागरिकांना त्यांचे जातीचे दाखले, उत्पन्न प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र यांसारख्या सेवा मिळवताना कोणताही त्रास होऊ नये, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

लोकाभिमुख प्रशासनावर शिक्कामोर्तब

प्रशासनात सुलभता आणि गती आणण्यासाठी कटियार यांनी राबवलेल्या या मॉडेलचे कौतुक राज्यभर होत आहे. सेतू केंद्रांत येणाऱ्या नागरिकांसाठी उत्तम बैठक व्यवस्था, टोकन यंत्रणा आणि जलद कार्यपद्धती , whatsapp chatbot आणि whatsapp वरती दाखले वितरण, यामुळे शासकीय कामांतील विलंब कमी झाला आहे. यामुळे वेळेत दाखले वितरण प्रमाण ५९% वरून ९९% पर्यत सुधारणा झाली आहे.

00000

बी.सी.झंवर/विसंअ


Join WhatsApp