Pune | Mon, 16 February 2026

No Ad Available

मुंबई महापालिका हद्दीतील अतिक्रमणांसंदर्भातील कार्यवाहीचा अहवाल आठ दिवसांत सादर करा – सभापती प्रा. राम शिंदे

Admin | 1 views
मुंबई महापालिका हद्दीतील अतिक्रमणांसंदर्भातील कार्यवाहीचा अहवाल आठ दिवसांत सादर करा – सभापती प्रा. राम शिंदे

मुंबई, दि.१६ : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि खासगी जमीनींवर अनधिकृत बांधकाम संदर्भात कार्यवाहीचा अहवाल आठ दिवसाच्या आत सादर करण्यात यावा, असे निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले.

विधानपरिषदेचे सदस्य सचिन अहिर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या अनुषंगाने विधानभवनात बैठक झाली. बैठकीस आमदार सचिन अहिर, आमदार मनोज जामसूदकर, मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, नगरविकास विभागाच्या सह सचिव विद्या हम्पय्या, विधानमंडळाचे सह सचिव राजेश तारवी आणि अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुंबई महानगर क्षेत्रात अतिक्रमणांबाबत कार्यवाही होणे गरजेचे असल्याचे आमदार  सचिन अहिर यांनी सांगितले.

यासंदर्भात निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी पथक नेमण्याबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती यावेळी विभागातर्फे देण्यात आली.

तातडीने कार्यवाही पूर्ण करुन येत्या आठ दिवसात यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे निर्देश सभापती प्रा. राम शिंदे यांनी यावेळी दिले.

०००

मोहिनी राणे/स.सं.


Join WhatsApp