
मुंबई दि. ९: भारतातील सर्वात लांब भूमिगत मेट्रोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबईत नुकताच पूर्ण झाला आहे. मेट्रो 3 (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) या अत्यंत आव्हानात्मक प्रकल्पाने अभियांत्रिकी कौशल्य, सातत्य आणि तांत्रिक अचूकता राखत अडथळ्यांची शर्यत यशस्वीपणे पार केली आहे. या प्रकल्पाच्या पूर्ततेदरम्यान आलेले अनुभव, तांत्रिक अडचणी आणि त्यावर केलेल्या उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव तथा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसीएल) व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या लोकप्रिय कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

आपल्या 25 वर्षांच्या सेवाकाळातील कामाचा आढावा घेताना अश्विनी भिडे यांनी मुंबईच्या पहिल्या भूमिगत मेट्रो मार्गापासून ते अरबी समुद्रालगतच्या कोस्टल रोड प्रकल्पापर्यंतच्या विविध महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्याचे सांगितले. या अनुभवांच्या आधारावरच त्यांना ‘मुंबई मेट्रो वूमन’ अशी ओळख मिळाली आहे. मात्र, ‘ही माझी नव्हे, तर संपूर्ण टीमची ओळख आहे,’ असे त्यांनी या मुलाखतीमध्ये नमूद केले.
या मुलाखतीत भिडे यांनी भूमिगत मेट्रो प्रकल्पातील तांत्रिक अडचणी व उपाययोजना, जुन्या इमारतींचे संरक्षण, भूगर्भातील सेवांचे स्थलांतर, वाहतूक व्यवस्थेचे नियोजन आणि समन्वय, तसेच नागरिकांची सुरक्षितता आणि अचूक अभियांत्रिकी या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर संवाद साधला आहे. निवेदक उन्नती जगदाळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
मुलाखत कधी आणि कुठे पाहता/ऐकता येईल?
‘दिलखुलास’ कार्यक्रमात (आकाशवाणी): ही मुलाखत 10 ते 15 डिसेंबर 2025 या कालावधीत सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर ऐकता येणार आहे. ही मुलाखत ‘News On AIR’ या मोबाईल ॲपवरही उपलब्ध असेल.
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात (दूरदर्शन – सह्याद्री वाहिनी): ही मुलाखत दोन भागात प्रसारित होणार असून, पहिला भाग मंगळवार, 16 डिसेंबर 2025 रोजी, तर दुसरा भाग मंगळवार, 23 डिसेंबर 2025 रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाहता येईल. तसेच महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर देखील ही मुलाखत पाहता येईल.
समाज माध्यमे: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर देखील ही मुलाखत उपलब्ध होईल.
X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR
Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR
YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
०००
जयश्री कोल्हे/स.सं
