Pune | Sat, 25 April 2026

No Ad Available

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले ढिकले कुटुंबियांचे सांत्वन

Admin | 6 views
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले ढिकले कुटुंबियांचे सांत्वन

नाशिक, दि. २५ एप्रिल २०२६ (जिमाका वृत्तसेवा):   नाशिक (पूर्व) विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड्. राहुल ढिकले यांच्या पत्नी आदिती ढिकले यांचे ह्दयविकाराने आज निधन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार ॲड्. ढिकले यांच्या निवासस्थानी भेट देवून ढिकले कुटुंबियांचे सांत्वन केले.

यावेळी त्यांचे समवेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार सरोज अहिरे, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, तहसलीदार पंकज पवार, अपर तहसीलदार अमोल निकम आदी उपस्थित होते.

0000


Join WhatsApp