Pune | Mon, 20 April 2026

No Ad Available

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अर्थसंकल्पावरील घडी पुस्तिकेचे प्रकाशन

Admin | 17 views
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अर्थसंकल्पावरील घडी पुस्तिकेचे प्रकाशन

नागपूर, दि. १४: माहिती व जनसंपर्क विभागाच्या नागपूर विभागीय माहिती संचालक कार्यालयाने महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी सादर अर्थसंकल्पामध्ये विदर्भासाठी करण्यात आलेल्या तरतुदींवर आधारित घडी पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले.

मुख्यमंत्री यांच्या रामगिरी शासकीय निवासस्थानी आयोजित अनौपचारिक कार्यक्रमात हे प्रकाशन पार पडले. नागपूर-अमरावती विभागाचे संचालक डॉ. गणेश मुळे, सहायक संचालक पल्लवी धारव, माहिती अधिकारी रितेश भुयार, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रसिद्धी समन्वयक अविनाश महालक्ष्मे, रमाकांत दाणी, अनिल गडेकर यावेळी उपस्थित होते.

अर्थसंकल्पात विदर्भातील कृषी, आरोग्य, उद्योग, शिक्षण, पायाभूत सुविधा आदींबाबत करण्यात आलेल्या तरतुदींची माहिती वैविध्यपूर्ण ग्राफिक्सद्वारे घडी पुस्तिकेत देण्यात आली आहेत. उत्तम रंगसंगती आणि मांडणीमुळे घडी पुस्तिका आकर्षक झाली आहे. विविध शासकीय कार्यालये आणि प्रसार माध्यमांसाठी ही घडी पुस्तिका संदर्भ म्हणून उपयुक्त ठरणार आहे.

०००

 

 


Join WhatsApp