मुंबई, दि. २३ : महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात मासिक सोडती तसेच साप्ताहिक सोडती काढल्या जातात. माहे ऑगस्ट – २०२५ मध्ये ९ ऑगस्ट २०२५ रोजी महाराष्ट्र सह्याद्री, १४ ऑगस्ट २०२५ रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी रक्षाबंधन विशेष, १९ ऑगस्ट २०२५ रोजी महाराष्ट्र तेजस्विनी, २० ऑगस्ट २०२५ रोजी महाराष्ट्र गौरव व दि. २७ ऑगस्ट २०२५ रोजी महाराष्ट्र गजराज या मासिक सोडती काढण्यात आल्याचे उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.
महाराष्ट्र तेजस्विनी या मासिक सोडतीमधून TJ- 01/9782 या महावीर लॉटरी सेंटर, कोल्हापूर व TJ- 07/9977 श्री. गुरूदेवदत्त लॉटरी एजन्सी, पुणे यांचेकडून विक्री झालेल्या तिकिटास रु.५ लाखाचे प्रथम क्रमांकाची दोन बक्षिसे जाहिर झाली आहेत.
तसेच महा. सागरलक्ष्मी ते महाराष्ट्रलक्ष्मी या साप्ताहिक सोडतीमधून रू. ८ लाखाच्या प्रथम क्रमांकाची एकूण दोन बक्षिसे जाहीर झाली आहेत.
याशिवाय ऑगस्ट-२०२५ मध्ये मासिक व भव्यतम सोडतीतून १२९३८ तिकीटांना रू. ४१,६०,२५०/- व साप्ताहिक सोडतीतून ५८४६३ तिकीटांना रू. १,६३,९२,३००/- ची बक्षिसे जाहीर झाली आहेत.
सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या संकेतस्थळावर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रू. १०,०००/- वरील बक्षिसाची मागणी या कार्यालयाकडे सादर करावी. रू. १०,०००/- च्या आतील बक्षिस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावी, असे उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.
0000
वंदना थोरात/विसंअ/
