Pune | Mon, 16 February 2026

No Ad Available

मांढरदेवी पाणीपुरवठा योजनेतील चार गावांचा पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवा – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

Admin | 9 views
मांढरदेवी पाणीपुरवठा योजनेतील चार गावांचा पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवा – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. 15 : मांढरदेवी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत येणाऱ्या चार गावांचा पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. मंत्रालयात आयोजित पाणीपुरवठा विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, जलजीवन मिशनचे व्यवस्थापकीय संचालक ई रवींद्र, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव रंगा नाईक आणि सहसचिव डॉ. बी.जी. पवार, मुख्य अभियंता प्रशांत भामरे यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यासंदर्भातील डीपीआर (तपशील प्रकल्प अहवाल) तयार करावे. महाबळेश्वर पाणीपुरवठा योजनेस अभय योजना सुरू झाल्यानंतर व्याज माफ करून मुद्दल रक्कम टप्प्याटप्प्याने भरण्याची संधी देण्याबाबतही सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सध्या पाण्याचा आकारण्यात येणारा दर कमी करावा. योजनांचे पाणी  नागरिकांना मिळावे. पाणी वितरणाची प्रक्रिया सुलभ व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

शिरवळ पाणीपुरवठा योजना तातडीने राबवावी आणि त्या माध्यमातून स्थानिकांसह औद्योगिक क्षेत्रात  पुरेसा व शुद्ध पाणीपुरवठा  करावा, अशी निर्देश मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिले.

0000

राजू धोत्रे/विसंअ

 


Join WhatsApp