Pune | Sun, 07 June 2026

No Ad Available

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत श्री काळाराम मंदिरात धर्मध्वज उभारणी सोहळा

Admin | 14 views
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत श्री काळाराम मंदिरात धर्मध्वज उभारणी सोहळा

नाशिक, दि. ६ मे  (जिमाका वृत्तसेवा) : आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७-२८ च्या पार्श्वभूमीवर पंचवटीतील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात आज धर्मध्वज उभारणी सोहळा पार पडला. अयोध्येच्या धर्तीवर उभारलेल्या २१ फूट उंच पंचधातूच्या धर्मध्वज स्तंभावर भगवा धर्मध्वज विधिवत पूजन करून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फडकविण्यात आला.

यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, महापौर हिमगौरी आडके-आहेर, अयोध्या न्यासाचे कोशाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज, महंत सुधीरदास पुजारी उपस्थित होते.

पंचधातूपासून तयार केलेल्या धर्मध्वज स्तंभावर ११ बाय ५ फूट आकाराचा भगवा ध्वज आहे. त्याच्यावर हनुमंतरायांची प्रतिमा तसेच सूर्यदेवतेचे ‘ॐ’ चिन्ह अंकित करण्यात आले आहे. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट आणि पारंपरिक अलंकरण करण्यात आले होते. सोहळ्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला औपचारिक धार्मिक प्रारंभ झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाला आमदार पंकज भुजबळ, आमदार सीमा हिरे,  ‘फिक्की’चे अध्यक्ष मिलिंद कांबळे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण (मालेगाव), अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील (नाशिक), निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, उपमहापौर विलास शिंदे, पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, शांताराम शास्त्री भानोसे, स्वामी अमृतानंद, वैष्णव व शैव आखाड्यांचे महंत, विश्वस्त शांताराम आवसारे, शुभम मंत्री, साधू-महंत आदी उपस्थित होते.

0000


Join WhatsApp