Pune | Sat, 06 June 2026

No Ad Available

कोराडी तलावाच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील अत्याधुनिक यंत्रणांसाठी प्रस्ताव सादर करा – मंत्री पंकजा मुंडे

Admin | 6 views
कोराडी तलावाच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील अत्याधुनिक यंत्रणांसाठी प्रस्ताव सादर करा – मंत्री पंकजा मुंडे

मुंबई, दि. २ : कोराडी येथील तलावाचे पाणी स्वच्छ व वापरण्यायोग्य असावे, यासाठी तिथे असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील यंत्रणा अत्याधुनिक करण्यासंदर्भातील प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.

कोराडी तलावाच्या स्वच्छता व पुनरुज्जीवनासंदर्भात मंत्री पंकजा मुंडे यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. राहुल रेखावार यांच्यासह पर्यावरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कोराडी येथील तलावात पाणी शुद्धीकरणासाठी सात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आहेत. मात्र, हे प्रकल्प जुने असल्याने त्यातील यंत्रणाही जुनी असल्याने ती अद्ययावत करणे आवश्यक आहे. त्यामुळे पर्यावरण विभागाच्या वतीने नवीन अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यास सहकार्य करण्याची मागणी मंत्री बावनकुळे यांनी केली. त्यावर श्रीमती मुंडे यांनी यासंदर्भात प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले. तसेच यासंदर्भात लवकरच सादरीकरण घेऊन व प्रस्तावाचा अभ्यास करून नवीन यंत्रणांसाठी निधीची कशा प्रकारे तरतूद करता येईल, हे पाहून प्रकल्पात अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यासाठी सहकार्य करण्यात येणार असल्याचे सांगितले.

0000

नंदकुमार वाघमारे/विसंअ


ताज्या बातम्या

Join WhatsApp