Pune | Sun, 15 February 2026

No Ad Available

कोकणातील अश्मयुगीन कातळशिल्प जतन संवर्धनासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी यांच्यामध्ये सामंजस्य करार

Admin | 24 views
कोकणातील अश्मयुगीन कातळशिल्प जतन संवर्धनासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी यांच्यामध्ये सामंजस्य करार

मुंबई, दि 27: जागतिक पर्यटन दिनानिमित्त कोकणातील अश्मयुगीन कातळशिल्प ( konkan Geoglyphs) जतन संवर्धन तसेच प्रचार, प्रसार आणि प्रसिद्धीसाठी   वैशिष्ट्यपूर्ण अमूल्य वारसा ठेवा जतन संवर्धन तसेच प्रचार, प्रसार आणि प्रसिद्धीसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन आणि निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी यांच्या मध्ये सामंजस्य करार पार पडला. संयुक्त राष्ट्र पर्यटन (UN Tourism) संस्थेअंतर्गत त्यांनी दिलेले घोष वाक्य ‘पर्यटन आणि शाश्वत विकास’यास अधीन राहून कार्यक्रम आयोजित  करण्यात आला होता.

जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत प्रधान कार्यालय व संलग्नित सर्व प्रादेशिक कार्यालय, पर्यटक निवास येथे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

युनेस्को जागतिक वारसा स्थळ दर्जा मिळण्याच्या प्रक्रियेत समाविष्ट असलेली कोकणातील अश्मयुगीन कातळशिल्प. भवितव्यात कोकण पर्यटन क्षेत्रात आणि त्याअनुषंगाने सर्वांगीण विकासात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार आहेत. एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक  नीलेश गटने यांनी रत्नागिरीस्थित कोकणातील कातळशिल्प आणि वारसा संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे भेट दिली. तसेच त्यांच्या प्रमुख उपस्थितीत गणपतीपुळे येथे आयोजित कार्यक्रमात निसर्गयात्री संस्था, रत्नागिरीचे संस्थापक अध्यक्ष तसेच कोंकणातील कातळशिल्प शोधकर्ते व अभ्यासक  सुधीर रिसबूड रत्नागिरी आणि प्रादेशिक व्यवस्थापक एमटीडीसीचे दीपक माने या दोघांच्या स्वाक्षरीने हा सामंजस्य करार करण्यात आला.

पर्यटन मंत्री  शंभूराज देसाई, राज्य मंत्री पर्यटन इंद्रनील नाईक यांच्या नेतृत्वाखाली प्रधान सचिव डॉ.अतुल पाटणे, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटने यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यासाठी कार्यक्रमाचे नियोजन  एमटीडीसीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांनी केले.


Join WhatsApp