Pune | Thu, 16 April 2026

No Ad Available

कंत्राटी कामगारांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करा – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

Admin | 3 views
कंत्राटी कामगारांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करा – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई, दि. १६ : महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या वीज कंपन्यांमधील कंत्राटी कामगारांच्या समस्यांचा आढावा ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी घेऊन कंत्राटी कामगारांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली एमएसईबी होल्डिंग कंपनीच्या सभागृहात बैठक झाली. या बैठकीस महानिर्मिती, महापारेषण व महावितरणचे संबंधित अधिकारी आणि भारतीय मजदूर संघ प्रणित  कंत्राटी कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत कंत्राटी कामगारांचे  वेतन, सेवा अटी, सुरक्षितता, विमा संरक्षण या विषयी चर्चा करण्यात आली. कामगारांच्या अडचणी तातडीने सोडवण्यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.  कंत्राटी कामगारांच्या समस्या संवेदनशीलतेने हाताळण्याबाबत सूचना  देत राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी कंत्राटी कामगारांच्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी दर तीन महिन्यांनी नियमित बैठक घेण्याचे निर्देशही दिले.

००००

एकनाथ पोवार/विसंअ


Join WhatsApp