Pune | Tue, 17 February 2026

No Ad Available

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबईहून दिल्लीला प्रयाण

Admin | 17 views
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबईहून दिल्लीला प्रयाण

मुंबई, दि. २७ : केंद्रीय गृहमंत्री तसेच सहकार मंत्री अमित शाह यांचे आज दुपारी ३.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून सीमा सुरक्षा दलाच्या विमानाने दिल्लीकडे प्रयाण झाले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड.आशिष शेलार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अमित साटम, आमदार प्रवीण दरेकर, आमदार रवींद्र चव्हाण, खासदार सुनिल तटकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इकबाल सिंह चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती, तसेच राजशिष्टाचार विभाग व पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

000

 


Join WhatsApp