
मुंबई, दि. १९ : संवेदनशील अभिनेते आणि दिग्दर्शक गुरुदत्त यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाने सांगितिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या सांगितिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले मुंबई येथे रविवार, १९ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्रौ ८.३० वाजता करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेता गुरुदत्त यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त “जाने क्या तूने कही” या सांस्कृतिक कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची असून सांस्कृतिक कार्य सचिव डॉ.किरण कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनातून निर्मिती झाली आहे.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार पराग आळवणी तसेच इतर लोकप्रतिनिधी हजर राहणार आहेत.
या कार्यक्रमात ख्यातनाम गायक गायिका सहभाग घेणार आहेत. सरिता राजेश, सौम्या वर्मा, सर्वेश मिश्रा, ओंकार देवासकर, अमित काकडे, रिधीमा लाड इ. कलाकार आपली कला सादर करतील.
हा सांस्कृतिक कार्यक्रम सर्व रसिक प्रेक्षकांना विनामुल्य पाहता येणार आहे. रसिक प्रेक्षकांनी या सांगितिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.
000
