Pune | Thu, 16 April 2026

No Ad Available

जगण्यातील श्रीमंती गमावली ! – सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

Admin | 9 views
जगण्यातील श्रीमंती गमावली ! – सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई, दि.12 : भोगल्या दु:खाचे आनंदी गाणे गाण्याची ताकद असलेल्या… जय शारदे.. वागेश्वरी ची प्रार्थना गाणाऱ्या… कॅब्रे, लावणी, भक्ती गीत, ओवी आणि अभंगासह भावगीत, चित्रपटगीतही विलक्षण ताकदीने गाणाऱ्या… भाषेची बंधने तोडून 20 पेक्षा जास्त भाषेत गाणाऱ्या… स्वतःच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटाला लिलया हरवणाऱ्या… आणि भाऊबीजेला “सोनियांच्या ताटी उजळल्या ज्योती…” अशी अजरामर ओवाळणी गाणाऱ्या आशाताई गेल्या.

माझ्यासाठी तर माझी प्रिय बहिण मी आज गमावली… साक्षात सरस्वतीच्या वीणेची झंकार आज शांत झाली.

मला भाऊ म्हणून उदंड प्रेम त्यांनी दिले. मी काय गमावले हे शब्दात सांगता येणार नाही…माझ्या जगण्यातील श्रीमंती गमावली… एवढे नक्की. त्यांच्या असंख्य भेटी माझ्या हृदयात साठवलेल्या आहेत, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

00000


Join WhatsApp